कोव्हिड-19चा प्रसार रोखण्यासाठी सन 2020मध्ये लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे लाखो मजूर बेरोजगार, उपाशी आणि बेघर बनले. यामुळे असाहाय्य आणि आणि लाचार झालेल्या बहुतेकांनी मृत्यूला कवटाळणार्या प्रवासाला सुरुवात करत घरी परतण्यासाठीचा रस्ता धरला. अशाच रितेश, आशिष, रामबाबू, सोनू, कृष्णा, संदीप आणि मुकेश हे सर्व बिहारचे स्थलांतरित मजूर यांनीसुद्धा असा प्रवास सायकलवरून सुरू केला. त्यांचा वेदनादायक प्रवास उत्तर प्रदेशमधील गाझियाबादपासून सुरू झाला आणि त्यांच्या मातृभूमी असलेल्या बिहारमधील सहरसापर्यंत चालला. यादरम्यान पोलिसांच्या काठ्या आणि त्यांनी केलेले अपमान, उपासमार, थकवा आणि भीती यांच्याशी त्यांनी लढा दिला. या सर्वांचे दस्तऐवजीकरण या पुस्तकात लेखक विनोद कापरी यांनी केलं आहे. 1232 किमी ही अनंत संकटांत सापडलेल्या सात पुरुषांच्या असाधारण धैर्याची कहाणी आहे.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers