"मी मन आहे", "मैं कृष्ण हूँ", "१०१ सुरस गोष्टी" तसंच "तुम्ही आणि तुमचा आत्मा" अशा बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी यांचं नवीन पुस्तक "३ सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका" नुकतंच प्रसिद्ध झालंय. सायंटिफिकली डिझाइन करण्यात आलेलं हे पुस्तक ३ सोप्या स्टेप्समध्ये तुमचं आयुष्य ३६० डिग्री बदलून टाकेल. पहिल्या स्टेपमध्ये हे पुस्तक तुमची स्वतःशीच नीट ओळख करून देईल. त्यामुळे तुम्ही स्वतःचं चांगल्या प्रकारे आत्मपरीक्षण करू शकाल. आणि हे गरजेचंही आहे, कारण मनुष्य स्वतःलाच नीट ओळखू न शकल्यामुळे अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकतो. म्हणूनच पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही व्यवस्थित आत्मपरीक्षण केलंत की, स्वनिर्मित सगळ्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकाल. याचप्रमाणे स्टेप २ तुम्हाला अनेक मानसिक, कौटुंबीक, व्यावहारिक आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवून देईल. आणि इथूनच स्टेप ३ सुरू होते. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे की, आयुष्यात समस्या नसतील, तर मनुष्य नक्कीच काही सकारात्मक करू शकतो. त्यामुळे स्टेप ३ ही फक्त आयुष्याला सकारात्मक वळण देण्यासाठी आहे. सर्वप्रथम ही स्टेप तुमचा आत्मविश्वास मजबूत करेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घ्यायलाही शिकवेल. जेव्हा निर्णय योग्य होऊ लागतील, तेव्हा तुमचं आयुष्य असंही कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers