जॉर्ज ऑर्वेल यांची रूपकात्मक उपहासगर्भ कादंबरी म्हणजे अॅनिमल फार्म. सन 1945मध्ये प्रथम प्रकाशित झालेली ही कादंबरी म्हणजे 1917 सालातल्या रशियन क्रांतीच्या सत्तासंघर्षाचं आणि त्यानंतर आलेल्या स्टॅलिनच्या दडपशाही कालखंडाचं प्रतीक आहे. जोसेफ स्टॅलिन आणि रशियावरच्या त्याच्या निरंकुश हुकूमशाहीवर निग्रहाने व उघड टीका करणार्या ऑर्वेलने ही कादंबरी राजकीय आणि कलात्मक हेतू एकत्र गुंफण्याच्या हेतूने लिहिली. सत्ता आणि भ्रष्टाचार यांच्या हव्यासातून आदर्शवादाला फशी पाडता येतं, हे या अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या पण अंगावर येणार्या, कालातीत अभिजात कादंबरीतून प्रत्ययाला येतं.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers