या क्रांतिकारी पुस्तकात लेखकाने ‘फिल गुड प्रॉडक्टिव्हिटी’ मागील विज्ञान तुमचं जीवन कसं बदलू शकतं, हे प्रकट केलं आहे. आनंददायक उत्पादकतेला अधोरेखित करणारे तीन छुपे ‘एनजायझर्स’, आपण दिरंगाईवर मात करायलाच हवी म्हणून दिलेले तीन ‘ब्लॉकर्स’ आणि प्रक्षोभ होण्यापासून बचाव करण्यासाठी तसंच चिरकालीन पूर्तता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारे तीन ‘सस्टेनर्स’ यांची ओळख लेखकाने या पुस्तकात करून दिली आहे. त्यांनी अशा संस्थापकांच्या, ऑलिंपियन्सच्या आणि नोबेल विजेते शास्त्रज्ञांच्या प्रेरणादायक कथा सांगितल्या आहेत, ज्यांनी ‘फिल गुड प्रॉडक्टिव्हिटी’च्या तत्त्वांना मूर्तरूप दिले. त्याचबरोबर लेखकाने असे सोपे, कृतीत उतरवता येण्यासारखे बदल सांगितले आहेत, जे तुम्ही आजपासूनच उपयोगात आणू शकता आणि त्याआधारे अधिक उत्पादनक्षम व परिपूर्ण होऊ शकता.
अली अब्दाल हे डॉक्टर आहेत आणि जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे उत्पादकता तज्ज्ञ आहेत. 2017मध्ये, केंब्रिज विद्यापीठात त्याच्या अंतिम वर्षात असताना, अली यांनी आरोग्य आणि उत्पादनक्षमतेबद्दल यूट्यूब व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्यांच्या चॅनेलला आता 3.4 दशलक्षपेक्षा जास्त सदस्य आहेत. उत्पादकता तज्ज्ञ म्हणून त्यांच्या कार्याव्यतिरिक्त, अली हे वैद्यकीय शाळेतील व्याख्याता, यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतील एक कनिष्ठ डॉक्टर आहेत.
Ali Abdaal I Vikas Shukla (Translator)Add a review
Login to write a review.
Customer questions & answers