हेच तर आहे ना की, कृष्णाबाबत तुम्ही तितकेच जाणता, जितके तुम्ही टीव्ही सीरियल्समधून पाहिले आहे! ...आणि त्या सगळ्यांनी मिळून कृष्णाच्या जीवनाला काहीच्या काही रूप दिले आहे! अशात मग कोणी हे कसे जाणावे की त्यांच्या या जीवनकहाणीतील खरे किती आणि भूलथापा किती? त्यामुळे त्याच उद्देशाने, ‘मैं कृष्ण हूँ’, ‘मी मन आहे’, ‘१०१ सुरस गोष्टी’, ‘तुम्ही आणि तुमचा आत्मा’ तसेच ‘३ सोप्या स्टेप्समध्ये जीवन जिंका’ यांसारख्या कित्येक बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक दीप त्रिवेदी सादर करत आहेत ‘कृष्णांची २००+ आश्चर्यचकित करणारी सत्यं’, जे सगळ्या प्राचीन शास्त्रांच्या सखोल संशोधनावर आधारित आहे. महाभारत, हरिवंश पुराण, भागवत पुराण, गर्ग संहिता यांसारख्या ३०हून अधिक शास्त्रांतून संशोधित केलेले हे पुस्तक आपल्याला कृष्णाच्या जीवनाविषयी असे काही जाणकार बनवील की त्यानंतर कुठलेही शास्त्र वाचण्याची गरजच उरणार नाही. जाणून घ्या आपले ‘नायक’ कृष्णाच्या जीवनाविषयीचे चकित करणारे, आजवर न ऐकलेले २००हून अधिक किस्से! हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये सगळ्या बुकस्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers