रेचल रोज सकाळी हीच गाडी पकडते. गाडी रोज त्याच सिग्नलजवळ थांबते. तिथून एका रांगेतली पाठमोरी घरं आणि घरांच्या पाठीमागे असलेले बगिचे दिसतात. रोज पाहून पाहून त्यांपैकी एका घरात राहणाऱ्या लोकांना आपण चांगलं ओळखतो, असं रेचलला वाटायला लागलंय. त्यांना एकत्र पाहून त्यांचं आयुष्य किती परिपूर्ण आहे, असंही तिला वाटतंय. रेचलही त्यांच्यासारखीच सुखी असती तर? ...आणि एक दिवस तिने त्या घरातील एक धक्कादायक घटना पाहिली आणि ते परिपूर्ण चित्र खराब झालं...ज्यांच्या आयुष्यात रेचल आजवर फक्त दूरवरून डोकावत होती, त्या आयुष्याचा एक भाग होण्याची संधी तिच्यापुढे चालून आली होती. आता सर्वांना समजेल, ती गाडीमधून रोज ये-जा करणारी सर्वसामान्य मुलगी नाही. तिच्यामध्ये आणखीही काही खास आहे! हे पुस्तक म्हणजे वेगवान, तणावपूर्ण, अप्रतिम उत्कंठावर्धक कादंबरी आहे.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers