या पुस्तकातून वोल्गा आपल्याला सीतेची गाथा सांगतात. पुरुषोत्तम रामाने त्यागलेल्या पत्नीची कथा आहे ही. यातून आत्माविष्काराच्या विलक्षण कष्टप्रद मार्गावर झालेली तिची वाटचाल आपल्या समोर येते. अडवणूक करणार्या प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त करणार्या इतर काही अलौकिक स्त्रियांना ती या वाटेवर भेटते. एका अनपेक्षित निग्रहाच्या दिशेने त्या सीतेला घेऊन जातात. त्या दरम्यान, अयोध्येचा आदर्श राजा राम आणि आपल्या पत्नीवर प्रेम करणारा निष्ठावंत पती या दोन भूमिकांचा पुनर्विचार करण्याची वेळ रामावरसुद्धा येते. आपलं जीवन आणि अनुभव यांकडे नव्या दृष्टीने बघण्याची ताकद स्त्रियांना या पुस्तकातून निश्चितच मिळते. हे पुस्तक म्हणजे स्त्रीवाद पुरस्कृत करताना वोल्गा यांच्याकडून आकाराला आलेली अप्रतिम गुंफण आहे.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers